September 22, 2012

My First Marathi Poem…


यश म्हणजे काय असते?
सतत वाट  पाहायला लावणारे असते...
स्वप्न पूर्ण झाल्यानंतरचे बक्षिस असते...
कष्टांचे सार्थक झाल्याचे समाधान असते
आई वडिलांच्या  डोळ्यातिल अभिमान पाहून स्वतःशीच हसलेला ऊर असते...
आपली वाट बरोबर असल्याचा विश्वास असतो...
लांबचा पल्ला गाठल्याचा आनंद असतो... 
स्वतःसोबत लोकांनाही दाखवून दिल्याची धमक असते...
अशक्यप्राप्य गोष्टही शक्य झाल्याची ती किमया असते...
आनंदाचे अश्रू अनुभवायची ती दुर्मिळ अशी वेळ असते...

No comments: