एक सांगू? माणसाने कधीही कुणाहीकडून मूळात अपेक्षाच ठेवू नये...
कारण जेव्हा त्या अपेक्षा आपल्याच हातांनी दाबुन मारून टाकाव्या लागतात
तेव्हा होणारी कुचंबणा ज्याची त्यालाच भोगावी लागते.
ती कुचंबणा व ते दु:ख इतक अधिक व खोल असते की न ते आपण
कोणाला सांगू शकत न ते मनात ठेवू शकत...
ते दु:ख नदीप्रमाणे मनात दुथडी भरुन वाहते.
लाटांवरच्या लाकडी फळीप्रमाणे हेलकावे व गटांगळ्या खाते.
मदतीसाठी किंचाळत. आक्रोश करते.
परंतू त्या किंकाळ्याही आपण आपल्या स्वाभिमान (किंवा अभिमान? मला माहीत नाही)
यामुळे ऐकेनाश्या करतो...
ज्याचा परिणाम होतो तो आपल्यावरच...
परिणाम म्हणजे काय? व कसा?
तर राग, दुःख, द्वेष, क्लेश, गैरसमज, संताप... या
व अशा अनेक भावना जन्माला येतात आणि
येतात आणि रुजत जातात.
या अशा भावनांमधून कधीही न सुटणारा तिढा निर्माण होतो.
'मला वाटल नव्हतं' असं वाटायला लागत. त्या
माणसांवर, क्वचित स्वतःवरही 'केवळ विश्वास
ठेवला' यासाठी दोषारोप केलें जातात. मने वाईट
होतात. माणसांमधील आणि मनातील दुरावे
वाढतात ते वेगळेच !!
या सगळ्याला कारण काय? तर
ती... क्षुल्लक अपेक्षा ! म्हणुन कुठल्याही सुजाण व
समंजस माणसाने कुणाहीकडून कधीही कसलीही
अपेक्षा न ठेवलेलीच बरी ! आपल्या हिमतीने "लाथ
मारीन तिथून पाणी काढीन" ही वृत्ती ठेवावी.
अपेक्षाच नसतील तर त्यामागील दु:ख आणि तो
मनस्ताप तरी होणार नाही. त्या दुष्ट वादळात न
कोसळता किमान आपली सुटका तरी होईल!!
No comments:
Post a Comment